Tuesday 7 April 2015

जन्मतः बापाला रडवले. . . .


जन्मतः बापाला रडवले. . . .
का. .?? तर फक्त मी मुलगी जन्माला आले
म्हणून. . . .!!!!
थोडी मोठी झाली नाही तर, या समाजाने
आईला रडवले. . . . .
का. .?? तर तीने मला जगायला थोडी मोकळीक
दिली म्हणून. . . .!!!!
कशीबशी आई बाबांनी चार बुकं शिकवली. . . . .
समाजाचे बोल एकून. . . .!!
आज मी शीकून मोठी तर झालेय. . . .पण,
हा समाज मला पुढे जाउन देत नाहिये. . . . .
त्यांच्या अद्न्यात मला मागे खेचू पाहत
आहेत. . . . .
माझ्या भविष्याच्या रस्त्यात काटे पेरु पाहत
आहेत. . . . .
सगळ्या बंधनांना झुगारुन मला पुढे
जायचंय. . . . .
मला काहितरी करुन दाखवायचंय. . . . .
पुढे कोणताच बाबा रडला नाहि पाहिजे,
मुलगी जन्माला आली म्हणून. . . .!!!!
असं काहितरी करायचंय मला अन् ते
मी करणारच. . . . . .!!!!
लाईक केलं नाहि तरी चालेल पण जास्तीत जास्त
शेअर करा आणि टँग करा

No comments:

Post a Comment